Showing posts with label तमिळनाडू. Show all posts
Showing posts with label तमिळनाडू. Show all posts

Thursday, January 25, 2018

हिंदीविषयी असलेले गैरसमज

हिंदीबाबत आपल्याकडे अनेक चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आणि रूढ झालेल्या आहेत.
पाहिलं म्हणजे आजच्या काळात हिंदी भाषा हि बरेच बदल झालेली खडी बोली हीच आहे.
उत्तरेतली हिंदी हि खडी बोली आणि आपली ती हिंदी असं नाहीये,
खडी बोली हि इंडो आर्य कुळातली एक भाषा आहे जी इंडो आर्य कुळाच्या मध्य शाखेत येते;
मराठी दक्षिण शाखेत, गुजराती, राजस्थानी पश्चिम; गढवाळी, कुमावनी पहाडी शाखेत; तर भोजपुरी , बंगाली, असामी इत्यादी पूर्व गटात येतात,
खडी बोली ह्या मूळ दिल्ली, मेरठ परिसरातील देशी भाषेवर फारशी प्रभाव होऊन उर्दू जन्माला आली. तिच्यात पुढे इतर भाषांचे शब्द येत गेले आणि तिला हिंदुस्तानी म्हणलं जाऊ लागलं (फारशी अक्षरांत लिहिलेली भाषा) ,
पुढे इस १९०० नंतर उत्तरेतील काही लोकांनी आपली मातृभाषा असलेल्या ब्रज, अवधी, भोजपुरी, राजस्थानी सोडून हिंदुस्तानी लाच पुढे आणलं, तिच्यात फारशी शब्दांऐवजी संस्कृत शब्द घालून (खरतर घुसवून) तिला हिंदी असं नाव दिलं, खडी बोलीचं हे रूप कोणत्याही माणसाची मातृभाषा नाही, पण उत्तरेतील धार्मिक तणावाच्या वातावरणामुळे हे रूप मोठ्या प्रमाणवर स्वीकारलं गेलं, खरतर हिंदुस्तानच्या (उत्तर भारताच्या) सगळ्याच भाषा ह्या हिंदी आहेत  पण संस्कृत शब्द घातलेल्या खडी बोली भाषेला हिंदी असंनाव देऊन भाषिक राष्ट्रीयत्व निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, पण घटनेतील समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्या अंगीकारामुळे, हिंदी भाषेच्या दादागिरीमुळे आणि स्वाभिमानी अहिंदी नागरिक विशेषतः तमिळ भाषिकांच्या विरोधामुळे हिंदी=भारत हे भाषिक राष्ट्रीयत्व तेवढ्यापुरतं टाळलं गेलं.
पण ह्या अतिरेकाची मुळंअजूनही जिवंत आहेत आणि राष्ट्रभाषा, राजभाषा, संपर्कभाषा इत्यादी गोंडस नावं वापरून भारत = हिंदी हा समाज पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.

संदर्भ -
१.
 https://en.wikipedia.org/wiki/Indo-Aryan_languages#Classification
२. https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/15/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/
 1

Thursday, December 23, 2010

तमिळनाडू


तमिळनाडू हे राज्य खरं तर आपल्याला लहानपणापासून ऐकलेलं असूनही फारच अनोळखी वाटतं,तिथले लोक,त्यांची भाषा,राहणी आणि स्वभाव ह्या बद्दल आपण बरंच काही ऐकलेलं असतं(अर्थात जास्ती निगेटीवच), पण माझा अनुभव मात्र खूप छान होता. तमिळनाडू म्हणलं कि सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतात ती भलीमोठी गोपुरं असलेली प्राचीन, प्रशस्त आणि अविस्मरणीय मंदिरं!!! तामिळनाडूला जावून काही पाहणं जर अगत्याचं असेल तर ते म्हणजे त्यांची मंदिरं !!!
आम्ही आमची तामिळनाडू ट्रीप सुरु केली ती तिरुचिरापल्ली ह्या ऐतिहासिक नगरीपासून. बेंगळूरहून बेंगळूर-होसूर-सेलम-नमक्कल असा रात्रभर प्रवास करून सकाळी नऊच्या सुमारास आम्ही तीरुचीला पोचलो. प्रवास तसा चांगलाच झाला होता. सकाळी उजाडलं तेव्हा सेलमला पोचलो होतो. सेलम तसं मोठं गाव आहे- जवळपास १०-१२लाख लोकसंख्येचं.पोचल्या पोचल्या बघतो तर काय...........चहा करण्यासाठी चक्क आपण पाणी तापवायला वापरतो तसले बंब ठेवलेले होते. भाषेचा प्रॉब्लेम सेलमच्या पुढूनच सुरु झाला. कारण त्या आधीच्या गावांमध्ये आम्हाला येत असलेली कानडी भाषा समजत होती. इकडे मात्र तमिळ आणि अगदीच तुटकी-फुटकी इंग्लिश भाषा येत होती लोकांना.
तमिळनाडू मध्ये कुठल्याही गावामध्ये सापडणारी कॉमन गोष्ट म्हणजे गर्दी,गोंगाट आणि मोठ्या आवाजात लावलेली गाणी (अर्थात तमिळच).अगदी रात्री दोन वाजता सुद्धा हे लोक तेवढ्याच उत्साहात गाणी वगैरे ऐकतांना दिसतील. बस मध्ये तर रात्रभर टीव्ही वर कुठले तरी अगम्य सिनेमे सुरु होते, आणि रात्री अडीच वाजता सुद्धा लोक सिनेमे बघतच होते! खरी मजा आली ती सेलम ला बस बदलल्यावर..........
सेलम ते तीरूची बसचं तिकीट ४४ रुपये होतं...आम्हाला वाटलं एखाद्या तासात संपेल प्रवास.पण चक्क तीन तास झाले तरीही प्रवास काही संपेना. तेव्हा लक्षात आलं कि इकडे बसचं भाडं आपण कल्पना करू शकतो त्यापेक्षाही स्वस्त आहे.

तिरुची तामिळनाडू मधील एक महत्वाचं शहर आहे. बऱ्याच ऐतिहासिक दाख्ल्यांमध्ये ह्या शहराचा उल्लेख सापडतो.कावेरी नदीकाठी वसलेल्या ह्या सुंदर शहरात आपण प्रवेश करतो ते श्रीरंगम् ह्या कावेरी नदीतल्या बेटावरून. तिरुच्चीमध्ये थोडा नाश्ता करून आम्ही रॉकफोर्ट बघायला गेलो. रॉकफोर्ट हे तिरुची शहराचं प्रतीक आहे.शहराच्या जुन्या भाग्यात वसलेल्या ह्या किल्ल्यामध्ये खूप जुनं आणि प्राचीन मंदीर आहे.ह्या मंदिराचं नाव तायुमनस्वामी कोईल असं आहे.देव तायुमनस्वामी म्हणेच महादेव आहे. इथल्या महादेवाची काहीतरी वेगळीच कथा सांगितली जाते त्यावरूनच ह्या देवाला तायुमनस्वामी असं पडलं आहे.तमिळ आणि कानडी भाषेत आई साठी तायी असा शब्द आहे. पूर्णपणे दगडात बांधलेल्या ह्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर जवळपास ३ मजली आहे.मंदिराच्या वर चढून गेल्यास पूर्णपणे दगडाच्या टेकडीवरच शिखरावर एक मंदिर आहे. ह्या मंदिरातल्या देवाचा नाव वाचून देव कोणता तेच कळेना. देवाचं नाव होता ‘अरुल्मिगु उच्चापिळळीयार!’ मंदिरात गेलो तेव्हा लक्षात आलं हा तर आपला गणपती बाप्पा!
तामिळनाडू मध्ये देवांना सुद्धा त्यांची स्वतःची तमिळ नावं आहेत!
रॉकफोर्टच्या परिसरात खूप गजबजलेली बाजारपेठ आहे.तामिळनाडूमध्ये बाजारपेठांचं सुद्धा फार प्रस्थ आहे. खासकरून सोन्याची तर फार मोठमोठी दुकानं पाहायला मिळतात.
इथून आम्ही पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रीरंगम इथे जाण्यासाठी निघालो.जवळपास ५ की.मी. अंतरावर असलेल्या ह्या कावेरी नदीतील बेटावर अनेक पवित्र मंदिरं आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे श्री रंगनाथ स्वामी मंदिर. जगातील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर अशी ह्या मंदिराची ख्याती आहे.प्रचंड मोठं गोपुरम् असलेलं हे महाकाय मंदिर आपलं मनापासून स्वागत करतं.आपण आत प्रवेश करताच एका मागे एक अशी अनेक गोपुरं लागत जातात. प्रत्येक गोपुरावारची कलाकुसर अगदी बघण्यासारखी असते.देवादिकांच्या असंख्य गोष्टींची अनेक सुबक आणि अतिशय सुंदर अशी शिल्प ह्यावर पाहायला मिळतात.हि गोपूरं फार काही जुनी वाटत नाहीत.म्हणजे घडण आणि आराखडा जुनाच आहे,पण नव्याने जीर्णोद्धार झालेली आहेत.
मुख्य मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामात आणि अतिशय सुबक,सुंदर आणि भव्य आहे. मंदिरातील कृष्णाची मूर्ती खरोखर सुंदर आहे.

श्रीरंगम् मधील आणखी एक मुख्य मंदिर म्हणजे तिरुवन्नैकोईल. त्याबद्दल वर्णन पुढच्या लेखात..धन्यवाद!!