Thursday, January 25, 2018

हिंदीविषयी असलेले गैरसमज

हिंदीबाबत आपल्याकडे अनेक चुकीच्या गोष्टी पसरलेल्या आणि रूढ झालेल्या आहेत.
पाहिलं म्हणजे आजच्या काळात हिंदी भाषा हि बरेच बदल झालेली खडी बोली हीच आहे.
उत्तरेतली हिंदी हि खडी बोली आणि आपली ती हिंदी असं नाहीये,
खडी बोली हि इंडो आर्य कुळातली एक भाषा आहे जी इंडो आर्य कुळाच्या मध्य शाखेत येते;
मराठी दक्षिण शाखेत, गुजराती, राजस्थानी पश्चिम; गढवाळी, कुमावनी पहाडी शाखेत; तर भोजपुरी , बंगाली, असामी इत्यादी पूर्व गटात येतात,
खडी बोली ह्या मूळ दिल्ली, मेरठ परिसरातील देशी भाषेवर फारशी प्रभाव होऊन उर्दू जन्माला आली. तिच्यात पुढे इतर भाषांचे शब्द येत गेले आणि तिला हिंदुस्तानी म्हणलं जाऊ लागलं (फारशी अक्षरांत लिहिलेली भाषा) ,
पुढे इस १९०० नंतर उत्तरेतील काही लोकांनी आपली मातृभाषा असलेल्या ब्रज, अवधी, भोजपुरी, राजस्थानी सोडून हिंदुस्तानी लाच पुढे आणलं, तिच्यात फारशी शब्दांऐवजी संस्कृत शब्द घालून (खरतर घुसवून) तिला हिंदी असं नाव दिलं, खडी बोलीचं हे रूप कोणत्याही माणसाची मातृभाषा नाही, पण उत्तरेतील धार्मिक तणावाच्या वातावरणामुळे हे रूप मोठ्या प्रमाणवर स्वीकारलं गेलं, खरतर हिंदुस्तानच्या (उत्तर भारताच्या) सगळ्याच भाषा ह्या हिंदी आहेत  पण संस्कृत शब्द घातलेल्या खडी बोली भाषेला हिंदी असंनाव देऊन भाषिक राष्ट्रीयत्व निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, पण घटनेतील समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्या अंगीकारामुळे, हिंदी भाषेच्या दादागिरीमुळे आणि स्वाभिमानी अहिंदी नागरिक विशेषतः तमिळ भाषिकांच्या विरोधामुळे हिंदी=भारत हे भाषिक राष्ट्रीयत्व तेवढ्यापुरतं टाळलं गेलं.
पण ह्या अतिरेकाची मुळंअजूनही जिवंत आहेत आणि राष्ट्रभाषा, राजभाषा, संपर्कभाषा इत्यादी गोंडस नावं वापरून भारत = हिंदी हा समाज पसरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातो.

संदर्भ -
१.
 https://en.wikipedia.org/wiki/Indo-Aryan_languages#Classification
२. https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/15/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87/
 1

Translation- Vrundavani VeNu vaje | वृंदावनी वेणू वाजे - इंग्रजी भाषांतर

वृंदावनी वेणू वाजे वेणू कवणाचा माये ॥धृ॥ 
vrndaavani veNu vaje
veNu kawaNaachaa maay vaaje ho..
The flute (veNu) makes sound (is being played) in the Vrundavana, the venu is like a poem 
~
वेणूनादे गोवर्धन गाजे । पुच्छ पसरूनी मयूर विराजे । मज पाहता भासती यादवराजे ॥१॥ 
veNunaade gowardhana gaaje..
puccha pasaruni mayura viraje
maja paahaata bhaasati yaadava raaje...
this sound of veNu (venunade) fillls the whole Govardhana mountain. spreading it's tail, the peacock is dancing , it seems to me as Yadava Raje (Krishna) is looking at me 
~
तृणचारा चरू विसरली । गाईव्याघ्र एके ठायी झाली । पक्षीकुळे निवांत राहिली । वैरभाव समूळ विसरली ॥२॥
truNa chara charu visaralee
gaayi vyaaghra eka Thaayi zaale (tsaalee)
pakShee kuLe niwanta raahilee
vaira bhaava samuLa visaralee...
forgetting to graze, the cow and tiger come together,birds are relaxed, the feeling of enmity is completely vanished, 
~
यमुनाजळ स्थिरस्थिर वाहे । रविमंडळ चालता स्तब्ध होये । शेष कूर्म वराह चकीत राहे । बाळा स्तन देऊ विसरली माये ॥३॥ 
yamunajaLa sthirasthira vaahe. ravimandaLa chaalata stabdh hoye , shesha kurma varaha chakit raahe, baaLa stana deu visarali maaYe
the water of Yamuna is flowing slowly (almost stopped), the ravimanDala (the planets and stars with sun have stopped too, shesha, kurma varaha are mesmerized, the mother forgot to feed her child... 

ध्वनी मंजूळ मंजूळ उमटती वाकी रुणझुण रुणझुण वाजती । देव विमानी बैसोनि स्तुति गाती भानुदासा पावली प्रेमभक्ति ॥४॥
dhwani manjuLa manjuLa umaTatee
waakee ruNuzuNu ruNuzuNu waazatee
deva vimanee baisonee stuti gaatee
bhaanudaasaa paawalee prem bhakti... 
the sound produced is nothing but sweet, the anklets make sound ruNuzuNu, the gods sitting in vmana are singing praise, Bhanudasa is blessed with love and devotion (premabhakti)
*************
Ajit Kadkade's version is really beautiful too!


Sunday, July 23, 2017

हिंदी ही राष्ट्रभाषा का नाही ?


मी मराठीतच विचार करतो, खातो, झोपतो, स्वप्न पाहतो. भाषा हा भावनिक, बौद्धिक, आत्मिक, बंध आहे, मराठीत माझ्या असण्याची मूळं रुजलेली आहेत, इतर भाषांशी माझं नातं असं नाही. 
 महेश एलकुंचवार, प्रसिद्ध मराठी लेखक-  

आपल्या भारतात राष्ट्रभाषा, राज्यभाषा, राजभाषा ह्या नावाने मराठी मोठी की देशाच्या दृष्टीने दुसरी कोणती भाषा मोठी असे प्रश्न नेहमीच विचारले जातात, पाडले जातात, तर सुरुवातीला एक गोष्ट लक्षात घ्या, संपर्क भाषा आणि राष्ट्रभाषा एकच नाहीत! 
पर्यटकांना बाहेरच्या राज्यात गेल्यावर लागते ती संपर्कभाषा, ती इंग्रजी, हिंदी, कोंकणी -तुम्हाला येणारी कोणतीही असू शकते, तुमच्या सोयीनुसार. ती तुम्ही निवडायची असते, अमुक एक भाषाच संपर्कभाषा म्हणून वापरा असं स्वतंत्र देशात सांगायचं नसतं. मी स्वतः गोव्यात गेल्यावर मराठी किंवा कोंकणी वापरतो, आंध्र-तेलंगण राज्यांत तेलुगु भाषा वापरतो, गुजरातेत गेल्यावर मला येत असलेली थोडंफार गुजराती वापरेन.
आपल्या देशात फक्त ५ टक्के लोक एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात,पर्यटन तसेच कामानिमित्त, त्यातही महाराष्ट्रासारख्या अहिंदी राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्यांची संख्या अगदीच कमी, ह्या पाच टक्क्यांतले बहुतांश लोक उत्तरेतून दक्षिणेतील महाराष्ट्रासारख्या राज्यात येत असतात. परराज्यात कामानिमित्त स्थायिक झालेल्या लोकांनी तिथली भाषा शिकून तिथल्या लोकांशी एकरूप होणं अपेक्षित असतं. राज्येही भाषावार स्थापन झालेली असल्यानं त्या त्या राज्याला तिथली अशी स्वतःची भाषा आहे.

राष्ट्रभाषा म्हणजे ती की जिच्यामुळे आपलं राष्ट्रीयत्व सिद्ध होतं, जी भाषा येत नसल्यास तुमचं राष्ट्रीयत्व सिद्ध होत नाही अशी भाषा,अशी कोणतीही राष्ट्रभाषा भारतात नाही, अशी भाषा असणं हे घटनेच्या पूर्ण विरोधात आहे.
आपण एक बहुभाषिक देश आहोत त्यामुळं आपलं राष्ट्रीयत्व एक भाषा व्यक्त करू शकत नाही, भारतीय असण्यासाठी एखादी भाषा वापरलीच पाहिजे असं अजिबात आवश्यक नाही, असा प्रकार घटनेच्या समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य ह्या तीन मुलभूत तत्वांच्याच विरुध्द जाणारा आहे. 

कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देणं हे ती भाषा बोलणाऱ्या नागरिकांना विशेष दर्जा देण्यासारखं आहे. भारतातले सगळे नागरिक हे घटनेनुसार समान असल्याने एका भाषेला विशेष दर्जा देऊन ही समानता काढून घेता येणार नाही. एकवेळ हिंदीला राष्ट्रभाषा असा दर्जा दिला तर हिंदी भाषा बोलणारे जास्त भारतीय आणि  इतर भाषा बोलणारे कमी भारतीय असा अर्थ त्यातून निघतो. त्यामुळे राष्ट्रभाषा ही संकल्पना घटनाविरोधी आणि परिणामी देशविरोधी ठरते.

ह्या एका राष्ट्रभाषेचा हट्टापायीच आपल्या शेजारील पाकिस्तानचे तुकडे पडून बांग्लादेश वेगळा झाला, श्रीलंकेत भाषिक संघर्ष भडकला. 
नुकतंच ह्याबाबतीत ज्येष्ठ उर्दू कवी गुलझार ह्याचं वक्तव्य आलं होतं ज्या ते म्हणतात कि मराठीसुद्धा राष्ट्रभाषाच आहे (इथं वाचा) 

हिंदीव्यतिरिक्त असलेल्या भाषांचा उल्लेख सर्रास प्रादेशिक भाषा असा केला जातो, परंतु मला तो चुकीचा वाटतो. तामिळ अभिजात आणि अत्यंत महत्त्वाची भाषा आहे. मराठी, गुजराती, बंगालीदेखील अभिजात दर्जाच्या आहेत. त्यांना प्रादेशिक म्हटले जाऊ शकत नाही.

भारताला राजकीय स्वातंत्र्य तर मिळाले, मात्र सांस्कृतिक स्वातंत्र्य अद्याप मिळाले नाही. अद्यापही आपण वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडलेलो नाहीत असे वाटते.
गुलझार-

भारतातल्या न्यायालयाने हिंदी राष्ट्रभाषा नाही हे सांगितलेलं तर आहेच पण त्याहीपुढे जाऊन अहिंदी भाषिकांसाठी हिंदी ही परभाषा (इथं वाचा) हेही सांगितलेलं आहे, हिंदी ही कधीही राज्यभाषेला पर्याय म्हणून वापरली जाऊ शकत नाही तसेच कोणालाही ती वापरण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.

शेतकऱ्यांना हिंदीतून नोटीस देण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हिंदी गुजरातींसाठी परदेशी भाषा असल्याचे म्हटले आहे.न्यायाधीश व्ही. एम. सहाई यांनी हा निर्णय देत शेतकऱ्यांना नोटीस गुजरातीमधून न देण्यात आल्याने या रस्त्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयाकडून हा प्रकल्प रद्दही केला जाऊ शकतो.

त्यामुळं संपर्कभाषा किंवा राष्ट्रभाषेच्या नावाखाली हिंदीसक्ती ही मराठीच्या मुळावर येणारी आहे हे लक्षात घेऊन महाराष्ट्रात मराठीच हे सूत्र वापरावं, हिंदीचा पर्याय देणं म्हणजे सरळसरळ मराठी शिकायची गरज संपवणं. जेव्हा एखाद्या प्रगतीशील असलेल्या प्रदेशात पूर्णच समजाला एखादी परभाषा येते तेव्हा तो प्रदेश दुभाषिक होत जातो, आपसूकच व्यवहारातून तिथली देशी भाषा हद्दपार होते, देशी भाषा शिकायची गरज संपून जाते. बाहेरून आलेल्या लोकांना सोडा, पण देशी भाषा मातृभाषा असणाऱ्यापुढच्या पिढीलाही आपली भाषा शिकायची गरज वाटत नाही, ती भाषा एकतर घरापुरती (इंग्रजीत ज्याला किचन् लँग्वेज् म्हणतात) तशी बनून राहते किंवा त्या प्रदेशाच्या वापरातून नष्ट होते. 
हा प्रकार म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून भाषिक वसाहतवादच आहे, ह्या भाषिक वसाहतवादाच्या पहिल्या पायरीवर दुभाषिक झालेल्या आपल्या दृष्टीकोनात बदल झालेला असतो, ह्याची पुढची पायरी म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्या नव्याने आलेल्या भाषेलाच आत्मसात करतात, गरज नसलेली आपली देशी भाषा शिकत नाही, टाकून देतात. काही जणांना तर आपल्या मायबोलीचीच लाज वाटायला लागते. आज आपण जर मुंबईतल्या काही लोकांची स्थिती पाहिल्यास हीच गत झालेली दिसून येईल.

ह्याबाबतीत आयरिश् भाषेचं उदाहरण बघता येईल (इथं वाचा)एकेकाळी वापरातून जवळपास निघून गेलेली आयर्लंडची आयरिश् भाषा आज तिच्या बोलणाऱ्यांच्या आग्रह आणि प्रयत्नामुळे परत एकदा मोठ्या श्रमाने वर येत आहे.

राष्ट्रभाषा आणि संपर्कभाषा ह्याशिवाय भारतात राजभाषा हाही एक प्रकार आहे, त्याविषयी पुढच्या लेखात लिहायचा प्रयत्न करीन.


संदर्भ 
१. 'गुजरातींसाठी हिंदी ही परदेशी भाषा' - गुजरात उच्च न्यायालय http://72.78.249.126/esakal/20120101/5485309142970143565.htm

२. मराठी, बंगाली, गुजरातीही हिंदीप्रमाणे राष्ट्रभाषा; प्रसिद्ध गीतकार गुलजार http://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-MODI-marathi-bengali-gujarati-are-national-language-like-the-hindi-5664181-NOR.html

३.The Decline of the Irish Language in the Nineteenth Century. http://www.yeatssociety.com/news/2015/03/09/the-decline-of-the-irish-language-in-the-nineteenth-century/

Wednesday, July 19, 2017

कर्नाटक - कानडी ध्वज म्हणजेच कन्नड बावुटा

कर्नाटकाच्या समाजकारण-राजकारणात झेंडा प्रकरणाचं बरंच महत्त्व आहे, डॉ. राजकुमार ते बी एस् यडीयुरप्पा पासून तर एपीजे अब्दुल कलामांपर्यंत सर्वांनीच हा झेंडा हातात घेतलेला आहे, हळद आणि कुंकाचं प्रतीक असलेला हा झेंडा प्रत्येक कानडी संघटना वापरते, 
 इसवी सन १९६५ ह्यावर्षी म. राममूर्ती ह्यांनी कन्नड पक्ष  नावाचा राजकीय पक्ष स्थापन करून पक्षाचा झेंडा म्हणून पहिल्यांदा वापरला,पुढे हा पक्ष चालला नाही,  पण झेंडा मात्र कानडी संस्कृतीचा आणि चळवळीचा झेंडा म्हणून पुढे आला.
कानडी भाषेत ह्याला सामान्यपणे कन्नडऽ बावुटा असं म्हणलं जातं.  हा झेंडा इतका सर्वमान्य झाला आहे की काही काळापूर्वी कर्नाटकातील कानडी आणि बिगर कानडी ख्रिस्ती लोकांच्या वादात कानडी ख्रिस्ती धर्मगुरूंनी सुद्धा हा झेंडा वापरला होता, हा झेंडा कर्नाटक आणि कानडी भाषा ह्याचं प्रतीक आहे.
बेंगळुरू शहरात प्रत्येक चौकात, गल्लीबोळात ह्या झेंड्याचे ध्वजस्तंभ पाहायला मिळतील, प्रत्येक शासकीय, खासगी आणि सार्वजनिक ठिकाणीही ध्वजस्तंभ असतोच, न्यायालयाने सामान्य नागरिकांना तिरंगा फडकविण्याचे स्वातंत्र्य दिल्यापासून ह्या ध्वजस्तंभांवर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला हा लालपिवळा झेंडा काढून    भारताचा तिरंगा फडकवला जातो.
हा झेंडा अधिकृत नसल्याने ह्याला विशिष्ट रंगरूप किंवा आकार नाही. काही लोक ह्यात कर्नाटकाचा नकाशा लावतात तर काही लोक सोबतीने शेतकऱ्यांचा म्हणून हिरवा रंग सुद्धा लावतात,
बऱ्याच चौकांत ऑटोरिक्षा संघटना, वेगेवेगळ्या मजूर - कर्मचारी संघटना हा ध्वजस्तंभ उभारतात, एक नोव्हेंबर ह्या कर्नाटक राज्य स्थापना दिवसाला कन्नड ऽ राज्योत्सव म्हणून साजरा करतात, त्यावेळी सर्वत्र हा झेंडा आणि पिवळ्या लाल रंगाचा पताका पाहायला मिळतात.
बेंगळुरू शहराबाहेर इतर ठिकाणी मात्र ह्या झेंड्याचा वापर तितकासा केला जात नाही, हा लालपिवळा असा मंगलमय भावना दाखवणारा झेंडा कानडी सार्वजनिक जीवनाचा मानबिंदू ठरलेला आहे हे मात्र नक्की.                      
-विशाल वि. नाव्हेकर

Friday, July 1, 2016

Maay bhavani tuze lekaru kushit tujhiya yei Lyrics Translated माय भवानी कुशीत तुझिया येई गाण्याच्या अनुवादाचा प्रयत्न





माय भवानी तुझे लेकरु कुशीत तुझिया येई = dear mother bhavaani, your kid comes close to you
सेवा मानून घे आई = please accept (my) service
तू विश्वाची रचिली माया = you are the one who has given rise to maaya (illusion) of this world 
तू शीतल छायेची काया = you are the one with the body which gives cold, pleasant shade
तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरित लयाला नेई = the continuous flow of your blessings takes the evils to end
तू अमला अविनाशी कीर्ती = you are the one which is pure, with unending glory
तू अवघ्या आशांची पूर्ती = you are the fulfillment of all desires
जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वातें नेई = what all is beautiful and auspicious, please take it to completion
तूच दिलेली मंजुळ वाणी = this sweet tongue is what you yourself has given
डोळ्यांमधले निर्मळ पाणी = the clear water in the eyes 
तुझ्या पूजना माझ्या पदरीं याविण दुसरे नाही = for your worship I have nothing other than these things



Tuesday, December 30, 2014

Translation of Marathi Abhanga ' je kaa ranjale gaanjale'

The great Abhanga by Santa Tukaarama 

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपुले ॥१॥
(je kaa ranjale gaanjale, tyaasi mhane jo aapule)

one who says his own to the ones who are deprived


तो चि साधु ओळखावा ।देव तेथेचि जाणावा ॥२॥(to chi saadhu oLakhaawaa, deva tethechi jaaNaawaa)

Identify him and him only as a saint/seeker , locate the god there only

मृदु सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
(mrudu sabahya navaneeta, taise sajjanaanche chitta)

Throughout (out and in) soft like the butter is the mind of the sajjanas (noble/righteous people)

ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी ॥४॥
(jyaasi apngita naahi, tyaasi dharee jo hrudayee)

 who holds them his heart the ones who have none to rely on

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥५॥
(dayaa karaNe putrasee, te chi daasaa aaNi daasee)

he loves his servants the same way he loves his own kids


तुका म्हणे सांगू किती । त्या चि भगवंताच्या मूर्ति ॥६॥
(tukaa mhaNe saangu kiti, tyaa chi bhagawantaachyaa murti) 

Tukarama says, how much to tell about him, they are the direct images of the god.


Sung by Bhimsen Joshi listen here
Sung by Suresh Wadkar here 

Monday, December 29, 2014

Translation of 'kaaya hee panDhari' Abhanga

This is the Abhanga sung by Bhimsen Joshi, written by Santa Ekanatha, in this Abhanga Ekanatha  looks the PanDahri in the world, thus essence of worship and pilgrimage in all walks of daily life.

काया
ही पंढरी आत्मा हा विठ्ठल । नांदतो केवळ पांडुरंग
॥१

(kaaya hee panDhari aatmaa haa viTThala, naandato kewaLa paanDuranga)
this body is PanDhari and soul is ViTThala, dwells only PanDuranga there


भाव-भक्ति भीमा उदक ते वाहे । बरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥

(bhaava bhakti bheemaa udka te waahe, barawaa shibhatase paanDuranga) 
feelings-devotion s the flowing water of Bheema river, suits the stunning, adorable PanDuranga.

दया क्षमा शांती हेचि वाळुवंट । मिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥

(dayaa kshamaa shaanti hechi waaLuwanTa, miLalase thaaTa vaishnavaanchaa)
compassion, forgiveness, peace is the desert (the sandy ground on the banks of Bheema river in PanDharapur) , we got the honour of being Vaishnava (dedicated to god)

ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद । हाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥

(jnaana dhyaana pooja viveka aananda, haachi veNunaada shobhatase)
knowledge, meditation,worship, thoughtfulness and thus happiness is what is the veNunaada – sound of flute (flute is the instrument lord Krishna plays)  

दश इंद्रियांचा एक मेळ केला । ऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥

(dasha indriyaanchaa eka meLa kelaa, aisaa gopaaLakaalaa hota ase) 
ten Indriyas are brought together and that is the gopaaL-kaala here
(GopaaLakaalaa is the mixture of different food items of different tastes, they are believed to be Lord Krishna’s favourite which he shares with his close friends)

Indriya is the Sanskrt-Yogic term for senses, there are thought to be ten Indriyas, five cognitive senses which
give us knowledge about outer world while five are active expressions.
Read it here.

देखिली पंढरी देही-जनी-वनी । एका जनार्दनी वारी करी ॥६॥

(dekhili panDhari dehee janee vanee, ekaa janaardanee waaree karee) 
thus we saw PanDharapura in my body, in the people, in the world -everywhere, eka (ekanatha) the disciple of Janardana thus completes the waari (pilgrimage of PanDharapura).

you can listen the song here too




Tuesday, December 16, 2014

Translation - Roopa paahata lochani रूप पाहतां लोचनीं

The Abhanga I am going to post today is very simple, yet very meaningful! Probably this is the beauty of Santa Sahitya of Marathi that the compositions are very simple and very easy to get but they give us the meaning which we can keep on finding all the way through our actions and thoughts!

This Abhanga penned by Dnyaneshwara is sung by many artists including Bhimsen Joshi, it was used in a movie Shree Santa Nivrutti Dnyanadeva, sung by Asha Bhosale.
All these versions are set in different tunes and each one of them sweet in their own manner!
But personally most I love is sung by Carnatic singer duo Ranjani Gayatri. (posting the links at the bottom of the post)

रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ (roopa paahata lochani। sukha zaale ho saajaNi।) 
Seeing the beauty (beautiful form) by my eyes, I got the bliss… o friend
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ (to haa viTThala barawaato haa maadhava barawa।)
That one Vitthala is beautiful, that one Madhava is beautiful
बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥३॥ (bahutaa sukrutachi joDi।mhaNuni viTThali aawaDee।)
Multiplying the good deeds, (then only) thus starts the love for Vitthala
सर्व सुखाचें आगरु । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ (sava sukhace aagaru। baapa rakhumadevivaru।)
Home of all the bliss, (is) father  Rakhuma Devi’s (Rukmini’s) husband [referring to Vitthala]

Film version by Asha Bhosale composed by legendary composer C. Ramachandra - here 
Pt. Bhimsen Joshi's version - here
My favourite - Ranjani-Gayatri's version - here 

Saturday, November 29, 2014

Translation of Marathi Abhanga ' panDhari chaa vaas' पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान -इंग्रजी अनुवादाचा प्रयत्न.



The Abhanga written by one of the greatest and earliest saint poet in Waarakari tradtion, Santa Namadeva (Namdev on wiki), composed by noted Marathi composer Srinivas Khale.

पंढरीचा
वास, चंद्रभागे स्नान । आणिक दर्शन विठोबाचे ॥१॥

stay in panDhari, bath in Chandrabhaagaa, and the darshana of Lord ViThobaa (ViTThala)

हेची घडो मज जन्मजन्मांतरी । मागणे श्रीहरी नाही दुजे ॥२॥
may the same happen to me for this birth and for the births I take in future, there is no other demand o Shrihari (another name of Lord Vishnu)


मुखी नाम सदा संतांचे दर्शन । जनी जनार्दन ऐसा भाव ॥३॥
(may there be) name of lord -nAma always in (my) mouth and darshana of saints, let me get the feeling of being with god (JanArdana) even when I am among the people, the poet probably wants to mean here is that let me see god in the people.

नामा
म्हणे तुझे नित्य महाद्वारी । कीर्तन गजरी सप्रेमाचे ॥४॥
Naama (Namadeva) says always on your great door, may I keep singing keertana of love (song of love)


Listen here

Translation of Marathi Abhanga 'maajhe maaher panDhari' माझे माहेर पंढरी -इंग्रजी अनुवादाचा प्रयत्न.

One more Abhanga sung by the great Pandita Bhimsen Joshi, written by Saint-poet Ekanatha (wiki article link) composed by Ram Phatak.

माझे माहेर पंढरी । आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
PanDhari (panDharaPura) is my mother’s house which is on the banks of BheemA (bheevaraa) river.
-In Indian context maaher (Kannada
ತವರುಮನೆ tavaru mane/ Hindi मायका maayakaa) or mother’s (parent’s place) house has a lot of importance as the girl leaves it for forever and comes to husband’s house –her own house still,, the hometown, the mom’s place remains her special for forever. Sense of belonging is attached with it. So the poet says that PanDharapura, the abode of Lord ViTThala is the maaher for him.

बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
father and mother, is my Vitthala and Rakhumai (Rukmini)


पुंडलीक राहे बंधू । त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
PunDalika stays as my brother, what should I tell about his fame !?
-Bhakta Pundalika is the person whose devotion is said to have brought Lord Vishnu from his abode VaikunTha to PanDharapura in the form of Lord ViTThala.


माझी बहीण चंद्रभागा ।करितसे पाप भंगा ॥४॥
my sister is ChandrabhagA (river BheemA is called ChandrabhagA in PanDharapura as it’s course takes the shape of moon crescent here), breaks the sins – makes us free of our sins.   


एका जनार्दनी शरण । करी माहेरची आठवण ॥५॥
ekA (which also means ‘one’) –ekanatha is devoted to/ surrendered to JanArdana (JanArdana Swamy was the guru of Saint Ekanatha, Guru is seen in very high respect in India and thus poet remembers his Guru in each of his compositions), remembering maaher -the mother’s home, PanDharapura. 

 mp3 link of the song, listen here